बरे होणाऱयांचे प्रमाण वाढल्याने सक्रिय रुग्णांमध्ये घट कायम
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात गुरुवारी पुन्हा कोरोना रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या 24 तासात देशात 21 हजारांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र, डिस्चार्ज मिळणाऱयांची संख्या वाढल्यामुळे सक्रिय रुग्णांमध्ये आणखी घट झाली आहे. गेल्या 24 तासात 26,139 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
देशात आतापर्यंत 1 कोटी 2 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 24 तासात देशात 21 हजार 822 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच देशात 299 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशभरात 2 लाख 57 हजार 656 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात एकूण 1 लाख 48 हजार 738 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा आता 1 कोटी 2 लाख 66 हजार 674 वर पोहोचल्याची माहिती गुरुवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आली. एकूण बाधितांपैकी 1 लाख 48 हजार 738 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 98 लाख 60 हजार 280 रुग्ण उपचाराअंती बरेही झाले आहेत. सध्या 2 लाख 57 हजार 656 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.