ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाची रोज उच्चांकी रुग्णवाढ नोंदवली जात आहेत. मागील 24 तासातही 2 लाख 17 हजार 353 रुग्णांची उच्चांकी नोंद झाली. तर 1185 रुग्णांचा मृत्यू झाला. बाधितांच्या आकडेवारीबरोबरच मृतांचा आकडाही सलग वाढत असून, मागील आठ महिन्यात एका दिवसात जीव गमावणाऱ्यांची संख्या गुरुवारी सर्वाधिक होती.
दरम्यान, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 42 लाख 91 हजार 917 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 74 हजार 308 एवढी आहे. गुरुवारी 1,18,302 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 25 लाख 47 हजार 866 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 15 लाख 69 हजार 743 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 11 कोटी 72 लाख 23 हजार 509 जणांना लसीकरण करण्यात आले.
देशात आतापर्यंत 26 कोटी 34 लाख 76 हजार 625 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 14 लाख 73 हजार 210 कोरोना चाचण्या गुरुवारी (दि.15) करण्यात आल्या.