ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 9883 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 206 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 2 लाख 56 हजार 611 वर पोहचली असून, मृतांची संख्या 7135 एवढी आहे.
सध्या देशात 1 लाख 25 हजार 381ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1 लाख 24 हजार 095 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशातील कोरोना रुग्णांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात 85 हजार 975 रुग्ण आढळले आहेत. दिल्ली 27 हजार 654, तामिळनाडूत 31 हजार 667, गुजरातमध्ये 20 हजार 070, मध्यप्रदेश 9401, आंध्र प्रदेश 4708, बिहार 5088, राजस्थान 10 हजार 599, उत्तरप्रदेश 10 हजार 536 तर पश्चिम बंगालमध्ये 8187 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.