ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील 24 तासात 28 हजार 903 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 188 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 14 लाख 38 हजार 734 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 59 हजार 044 एवढी आहे.
मंगळवारी 17,741 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 10 लाख 45 हजार 284 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 2 लाख 34 हजार 406 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 3 कोटी 50 लाख 64 हजार 536 जणांना लस देण्यात आली आहे.
देशात आतापर्यंत 22 कोटी 92 लाख 49 हजार 784 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 09 लाख 69 हजार 021 कोरोना चाचण्या मंगळवारी (दि.16) करण्यात आल्या.