ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 30 हजार 005 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 442 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 98 लाख 26 हजार 775 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 42 हजार 628 एवढी आहे.
शुक्रवारी दिवसभरात 33,494 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या देशात 3 लाख 59 हजार 819 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 93 लाख 24 हजार 328 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
देशात आतापर्यंत 15 कोटी 26 लाख 97 हजार 399 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 10 लाख 65 हजार 176 कोरोना चाचण्या शुक्रवारी (दि.11) करण्यात आल्या.