नवी दिल्ली
देशातील कोरोनाशी संबंधित निर्बंध केंद्रीय गृह मंत्रालयाने 31 जानेवारी 2022 पर्यंत वाढवले आहेत. सध्या केंद्र सरकारने राज्यांना कोरोनाच्या संसर्गानुरुप निर्बंध जारी करण्याची सूचना केल्यामुळे केंद्रीय निर्बंधांपेक्षा राज्यांतर्गत नियमावलीला अधिक महत्त्व आहे. असे असले तरी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले जाते की नाही याची शहानिशा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून होणार आहे. यामध्ये स्थानिक आणि जिल्हा प्रशासनालाही गरज भासल्यास नियंत्रणाबाबत पावले उचलण्यास सांगण्यात आले आहे.