ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 32 हजार 080 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 402 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 97 लाख 35 हजार 850 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 41 हजार 460 एवढी आहे.
मंगळवारी दिवसभरात 36,635 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या देशात 3 लाख 78 हजार 909 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 92 लाख 15 हजार 581 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
देशात आतापर्यंत 14 कोटी 98 लाख 36 हजार 767 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 10 लाख 22 हजार 712 कोरोना चाचण्या मंगळवारी (दि.8) करण्यात आल्या.