ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात अजूनही कोरोनाच्या दुसऱया लाटेचा प्रभाव दिसून येत आहे. मागील 24 तासात देशात 34 हजार 457 नवे रुग्ण आढळून आले. तर कालच्या दिवसात 375 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3 कोटी 23 लाखांवर पोहचली आहे. नवीन रुग्णांसह देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाख 61 हजार 340 वर पोहोचली आहे. ही रुग्णसंख्या गेल्या 151 दिवसांतील सर्वात कमी आहे.
शुक्रवारी 36,347 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 2 कोटी 63 लाख 90 हजार 584 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून सद्य स्थितीत हा दर 97.54 टक्के इतका आहे.
भारतात करोना विषाणूंच्या जनुकीय क्रमवारीचे काम इन्साकॉग ही संस्था करीत असून भारतात डेल्टा विषाणूचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. एकूण 30,230 नमुन्यांचे विश्लेषण केले असता त्यातील 20,324 नमुने डेल्टा विषाणूचे निघाले आहेत. भारतात एवाय 1, एवाय 2 एवाय 3 या डेल्टा प्लस विषाणूचे प्रकार महाराष्ट्रात जुलैमध्ये दिसून आले आहेत. त्यांचे प्रमाण एक टक्का होते. डेल्टा प्रजातीतील विषाणू आता आले असले तरी देशात डेल्टा प्लसचे 61 नमुने आतापर्यंत सापडले आहेत.