ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 36 हजार 469 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 488 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 79 लाख 46 हजार 429 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 19 हजार 502 एवढी आहे.
सोमवारी दिवसभरात 63,842 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशात 6 लाख 25 हजार 857 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 72 लाख 01 हजार 070 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशात आतापर्यंत 10 कोटी 44 लाख 20 हजार 894 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 09 लाख 58 हजार 116 कोरोना चाचण्या सोमवारी (दि.26) करण्यात आल्या.