ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 38 हजार 074 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 448 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 85 लाख 91 हजार 731 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 27 हजार 059 एवढी आहे.
सोमवारी दिवसभरात 42,033 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशात 5 लाख 05 हजार 265 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 79 लाख 59 हजार 406 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशात आतापर्यंत 11 कोटी 96 लाख 15 हजार 857 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 10 लाख 43 हजार 665 कोरोना चाचण्या सोमवारी (दि.9) करण्यात आल्या.