ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 38 हजार 772 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 443 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 94 लाख 31 हजार 692 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 37 हजार 139 एवढी आहे.
रविवारी दिवसभरात 45,333 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या देशात 4 लाख 46 हजार 952 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 88 लाख 47 हजार 600 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
देशात आतापर्यंत 14 कोटी 03 लाख 79 हजार 976 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 8 लाख 76 हजार 173 कोरोना चाचण्या रविवारी (दि.29) करण्यात आल्या.