ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 43 हजार 893 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 508 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 79 लाख 90 हजार 322 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 20 हजार 010 एवढी आहे.
मंगळवारी दिवसभरात 58,439 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशात 6 लाख 10 हजार 803 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 72 लाख 59 हजार 509 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशात आतापर्यंत 10 कोटी 54 लाख 87 हजार 680 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 10 लाख 66 हजार 786 कोरोना चाचण्या मंगळवारी (दि.27) करण्यात आल्या.