ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पहायला मिळत आहे. शुक्रवारी देशात 44 हजार 111 नव्या संक्रमितांची नोंद झाली. 57 हजार 477 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर 738 रुग्ण दगावले.
देशात आतापर्यंत 3 कोटी 05 लाख 02 हजार 362 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 96 लाख 05 हजार 779 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या 4 लाख 95 हजार 533 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 4 लाख 01 हजार 050 रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. देशात आतापर्यंत 34.46 कोटी नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.