ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना रुग्णवाढीने पुन्हा एकदा वेग घेतला आहे. सलग चौथ्या दिवशी कोरोनाच्या नवीन प्रकरणांनी 40 हजारांचा टप्पा पार केला आहे. शनिवारी देशात 45 हजार 083 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. 35 हजार 840 रुग्ण बरे झाले. तर 460 रुग्ण दगावले.
देशात आतापर्यंत 3 कोटी 26 लाख 95 हजार 030 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 3 कोटी 18 लाख 88 हजार 642 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या देशात 3 लाख 68 हजार 558 उपचारार्थ रुग्ण असून, 4 लाख 37 हजार 830 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.