ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 48 हजार 268 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 551 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 81 लाख 37 हजार 119 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 21 हजार 641 एवढी आहे.
शुक्रवारी दिवसभरात 59,454 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशात 5 लाख 82 हजार 649 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 74 लाख 32 हजार 829 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशात आतापर्यंत 10 कोटी 87 लाख 96 हजार 064 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 10 लाख 67 हजार 976 कोरोना चाचण्या शुक्रवारी (दि.30) करण्यात आल्या.