ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 54 हजार 366 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 690 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 77 लाख 61 हजार 312 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 17 हजार 306 एवढी आहे.
गुरुवारी दिवसभरात 73,979 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशात 6 लाख 95 हजार 509 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 69 लाख 48 हजार 497 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशात 10 कोटी कोरोना चाचण्या देशात आतापर्यंत 10 कोटी 01 लाख 13 हजार 085 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 14 लाख 42 हजार 722 कोरोना चाचण्या गुरुवारी (दि.22) करण्यात आल्या.