ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये घट पहायला मिळत आहे. सोमवारी देशात 60 हजार 471 नव्या संक्रमितांची नोंद झाली असून, मागील 75 दिवसातील हा सर्वात कमी आकडा आहे. यापूर्वी 30 एप्रिलला 53 हजार 237 संक्रमित रुग्ण आढळले होते. मागील 24 तासात 1 लाख 17 हजार 525 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर 2726 रुग्ण दगावले.
देशात आतापर्यंत 2 कोटी 95 लाख 70 हजार 881 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 82 लाख 80 हजार 472 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या 9 लाख 13 हजार 378 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 3 लाख 77 हजार 031 रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.
आतापर्यंत देशातील 25 कोटी 90 लाख 44 हजार 072 नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.