ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये घट पहायला मिळत आहे. शुक्रवारी देशात 60 हजार 753 नव्या संक्रमितांची नोंद झाली. 97 हजार 743 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर 1647 रुग्ण दगावले.
देशात आतापर्यंत 2 कोटी 98 लाख 23 हजार 546 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 86 लाख 78 हजार 390 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या 7 लाख 60 हजार 019 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 3 लाख 85 हजार 137 रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.
आतापर्यंत देशातील 27 कोटी 23 लाख 88 हजार 783 नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.