ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात 2 कोटी 99 लाख 35 हजार 221 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 88 लाख 44 हजार 199 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, 7 लाख 02 हजार 887 रुग्ण उपचार घेत आहेत.
रविवारी 53,256 नवे बाधित
रविवारी देशात 53 हजार 256 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. दैनंदिन रुग्णवाढीचा हा मागील 88 दिवसातील सर्वात कमी आकडा आहे. 78 हजार 190 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर 1422 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 3 लाख 88 हजार 135 एवढी आहे. आतापर्यंत 28 कोटी 36 हजार 898 नागरिकांना लस देण्यात आली आहे.