ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 75 हजार 809 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1133 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 42 लाख 80 हजार 423 वर पोहचली आहे. मृतांचा एकूण आकडा 72 हजार 775 एवढा आहे.
सध्या देशात 8 लाख 83 हजार 697 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 33 लाख 23 हजार 951 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशात 5 कोटी कोरोना चाचण्या
देशात आतापर्यंत 5 कोटी 06 लाख 50 हजार 128 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 10 लाख 98 हजार 621 रुग्णांची तपासणी सोमवारी एका दिवसात करण्यात आली.