ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 86 हजार 052 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1141 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 58 लाख 18 हजार 571 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 92 हजार 290 एवढी आहे.
सध्या देशात 9 लाख 70 हजार 116 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 47 लाख 56 हजार 165 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत देशात 6 कोटी 89 लाख 28 हजार 440 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 14 लाख 92 हजार 409 रुग्णांची तपासणी गुरुवारी एका दिवसात करण्यात आली.