ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये घट पहायला मिळत आहे. सोमवारी देशात 86 हजार 498 नव्या संक्रमितांची नोंद झाली असून, मागील 63 दिवसातील हा सर्वात कमी आकडा आहे. यापूर्वी 5 एप्रिलला 96 हजार 563 संक्रमित रुग्ण आढळले होते. मागील 24 तासात 1 लाख 82 हजार 282 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर 2123 रुग्ण दगावले.
देशात आतापर्यंत 2 कोटी 89 लाख 96 हजार 473 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 73 लाख 41 हजार 462 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या 13 लाख 03 हजार 702 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 3 लाख 51 हजार 309 रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.
आतापर्यंत देशातील 23 कोटी 61लाख 98 हजार 726 नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.