ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या 796 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 9 हजार 152 पोहचली आहे. एकूण मृतांचा आकडा 308 वर पोहचला असून, गेल्या 24 तासात 35 जण दगावले आहेत. तर आत्तापर्यंत 857 रुग्ण बरे झाले असते. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव आणि प्रवक्ते लव अग्रवाल यांनी आज दिली.
पुढे ते म्हणाले, नॅशनल कैडेट कोर कडून देखील मदत घेतली जात आहे. आता पर्यंत पन्नास हजारपेक्षा अधिक लोक स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत. तर आत्तापर्यंत तीस कोटी पेक्षा अधिक लोकांनी 28 हजार 256 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
कोरोनाची चाचणी करण्यासाठी एकूण 219 प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत दोन लाख सहा हजार पेक्षा चाचण्या करण्यात आल्या आहेत.
तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यावर भर दिला जात असून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी ट्रॅक मधून वाहतुक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अशा आशयाचे पत्र गृह मंत्रालयाकडून सर्व राज्यांना देण्यात आले आहे.
या ट्रॅक मध्ये चालक आणि वाहकालाच परवानगी असेल. या ट्रकना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यास देखील दिली आहे, अशी माहिती आयसीएमआर च्या प्रवक्त्यांनी दिली.
तसेच कोरोना रुग्णांसाठी ची रुग्णालये, सुविधा, चाचण्या अशा सर्व आघाड्यांवर क्षमता वाढवण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.