ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 92 हजार 605 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1133 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 54 लाख 620 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 86 हजार 752 एवढी आहे.
सध्या देशात 10 लाख 10 हजार 824 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 43 लाख 03 हजार 044 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत देशात 6 कोटी 36 लाख 61 हजार 060 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 12 लाख 06 हजार 806 रुग्णांची तपासणी शनिवारी एका दिवसात करण्यात आली.