ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 96 हजार 551 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1209 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 45 लाख 62 हजार 415 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 76 हजार 271 एवढी आहे.
सध्या देशात 9 लाख 43 हजार 480 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 35 लाख 42 हजार 664 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत देशात 5 कोटी 40 लाख 97 हजार 975 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 11 लाख 63 हजार 542 रुग्णांची तपासणी गुरुवारी एका दिवसात करण्यात आली.