ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 9985 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 279 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 2 लाख 76 हजार 583 वर पोहचली असून, मृतांची संख्या 7745 एवढी आहे.
सध्या देशात 1 लाख 33 हजार 632 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1 लाख 35 हजार 206 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत 90 हजार 787 रुग्ण आढळले आहेत. दिल्ली 31 हजार 309, तामिळनाडू 34 हजार 914, गुजरातमध्ये 21 हजार 014, मध्यप्रदेश 9849, आंध्र प्रदेश 5070, बिहार 5459, राजस्थान 11 हजार 245, उत्तरप्रदेश 11 हजार 335 तर पश्चिम बंगालमध्ये 8985 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.