एकास गंभीररित्या जखमी केल्याचा आरोप
प्रतिनिधी /मडगाव
गावकरवाडा -मळकर्णे येथील एस. घावकर (36) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मडगावच्या सत्र न्यायालयाने काल शुक्रवारी मंजूर करताना न्यायालयाच्या परवानगीशिवाय भारताबाहेर जाता कामा नये असा आदेश दिला आहे.
या प्रकरणातील अर्जदार संशयितास पोलिसांनी अटक केलीच तर 20 हजार रुपयांच्या बॉण्डवर व तितक्याच रकमेच्या हमीवर जामिनावर सोडण्यात यावे असेही अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. चोलू गावस यच्यां न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या आदेशात म्हटलेले आहे.
एका व्य्यक्तील गंभीररित्या जखमी केल्याचा आरोप अर्जदार संशयितावर पोलिसांनी ठेवलेला आहे. या प्रकरणी पोलीस अटक करतील या भीतीपोटी अर्जदार संशयितान्x न्यायालयात धाव घेतली होती. पोलीस ज्या ज्यावेळी चौकशीसाठी बोलावतील त्यावेळी पोलीस स्थानकात हजेरी लावावी असेही न्यायलयाने आदेशात म्हटलेले आहे.