शाहूवाडी /प्रतिनिधी
वारूऴ ता. शाहूवाडी येथे बीएसएनएल टॉवर परिसरात खुल्या जागेतील बेकायदा अवैध देशी दारू अड्ड्यावर शाहूवाडी पोलिसांनी छापा टाकून ६ हजार ५३२ रुपयांचा अवैध देशी दारूचा साठा जप्त केला. याप्रकरणी दिनेश पांडुरंग तावरे (वय ४३, रा. वारूऴ, ता. शाहूवाडी) या संशयिताविरुद्ध शाहुवाडी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
संशयित आरोपी दिनेश तावरे हा वारूळ परिसरात विनापरवाना, बेकायदा देशी दारूचा साठा करून त्याची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शाहूवाडी सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.पोलीस कर्मचारी रविंद्र राजाराम कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.