ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. शुक्रवारी दुपारी 12 वाजेपर्यंत 41 नवे रुग्ण आढळले आहेत. तर ऋषिकेश मध्ये एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे उत्तराखंड राज्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 550 वर पोहचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 550 रुग्णांपैकी 79 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. अप्पर सचिव आरोग्य युगल किशोर पंत यांनी सांगितले की, आज, शुक्रवारी पुन्हा 42 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर उत्तराखंडमध्ये गुरुवारी 30 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
हे सर्व रुग्ण डेहराडून, हरिद्वार, टिहरी, अल्मोडा आणि नैनिताल जिल्ह्यातील आहेत. दरम्यान, सर्व रूग्णांवर रूग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य लोकांचा शोध सुरू आहे.