ऑनलाईन टीम / देहरादून :
एक जुलैपासून देहरादून आणि छावणी परिषद भागातील धार्मिक स्थळे तसेच हॉटेल आणि मॉल देखील सुरू केले जाणार आहेत. मंदिरात आत जाण्यास परवागी नसेल. लांबूनच दर्शन घ्यावे लागणार आहे. तसेच या ठिकाणी सैनिटायझर आणि साबणाने हात धुण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. आशिष कुमार श्रीवास्तव यांनी दिली.
याबरोबरच सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क घालणे बंधनकारक आहे. मात्र, कॅन्टोन्मेंट झोनमधील धार्मिक स्थळे, हॉटेल आणि मॉल अजूनही बंदच असणार आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील तीन महिन्यांपासून देहरादून, गढी आणि क्लेमेंटटाउन छावणी परिषद भागातील धार्मिक स्थळे, हॉटेल आणि मॉल बंद होते. एक जुलैपासून प्रशासनाकडून धार्मिक स्थळे, हॉटेल आणि मॉल पुन्हा सुरू केले जाणार आहेत.
तसेच धार्मिक भागात प्रवेश करण्यापूर्वी हात पाय साबणाने धुणे बंधनकारक आहे. ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे नसतील, अशाच लोकांना प्रवेश दिला जाणार आहे. तसेच मशिदीमध्ये देखील सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून नमाज पडला जाईल.