ऑनलाईन टीम / देहरादून :
नकरौंदामध्ये जन शताब्दी ट्रेनच्या धडकेत एका हत्तीच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे पिल्लू दोन वर्षांचे होते. धडक एवढी जोरात होती की, या धडकेमुळे ते पिल्लू जवळपास 10 फूट खोल दरीत पडले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी सायंकाळी 5.30 वाजता घडली. ट्रॅक वरून जनशताब्दी ट्रेन जात होती. त्यावेळी अचानक ट्रेनच्या समोर ते दोन वर्षांचे हत्तीचे पिल्लू आले. हा अपघात नकरौंदा गुलरघाटी झिरो पॉईंट येथे घडली.
हत्तीच्या पिल्लाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अनेक लोकांनी दिलेल्या माहितीनंतर वनविभाग लच्छीवाला आणि पोलीस ठाण्याचे रेंज रेंजर एन एल डोभाल घटनास्थळी पोहोचले. याआधी देखील ट्रेनच्या धडकेमुळे हत्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. या संदर्भात अनेकवेळा वन अधिकारी आणि रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक झाली आहे.