ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील 24 तासात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येने अडीच लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गुरुवारी दिवसभरात देशात 2 लाख 64 हजार 202 नवे बाधित आढळून आले. तर 1 लाख 09 हजार 345 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या देशातील दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 14.78 टक्के आहे.
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या सध्या 12 लाख 72 हजार 073 आहे. गुरुवारी दिवसभरात 315 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 4 लाख 85 हजार 350 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
दरम्यान, भारतातील 27 राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला असून, एकूण ओमिक्रॉन बाधितांची संख्या 5753 एवढी आहे.