ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये घट पहायला मिळत आहे. सोमवारी 42 हजार 640 नव्या संक्रमितांची नोंद झाली असून, मागील 91 दिवसातील हा सर्वात कमी आकडा आहे. यापूर्वी 23 मार्चला 47 हजार 239 संक्रमित रुग्ण आढळले होते. मागील 24 तासात 81 हजार 839 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर 1167 रुग्ण दगावले.
देशात आतापर्यंत 2 कोटी 99 लाख 77 हजार 861 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 89 लाख 26 हजार 038 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या 06 लाख 62 हजार 521 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 3 लाख 89 हजार 302 रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.
आतापर्यंत देशातील 28 कोटी 87 लाख 66 हजार 201 नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.