बार्शीच्या जगदाळे मामा रुग्णालयात कोरोनावर मोफत उपचार चालू
प्रतिनिधी / बार्शी
बार्शी येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे या हॉस्पिटलला शासनाने डेडिकेटेड कोरोना हॉस्पिटल म्हणून जाहीर केले आहे. याठिकाणी कोरोना रुग्णांवरती मोफत उपचार मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे जात होत्या. याच कालावधीमध्ये दैनिक तरुण भारत संवाद ने शासन निर्णय नुसार या हॉस्पिटलला मोफत उपचार महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून होणार अशी बातमी छापली होती. मात्र तरीही हॉस्पिटल प्रशासनाने उपचार मोफत होणार नाहीत, असे सांगितल्याने आज बार्शी शहर शिवसेनेने शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्या नेतृत्वात जगदाळे मामा हॉस्पिटल याठिकाणी आंदोलन केले यावेळी या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बी. वाय . यादव यांनी आंदोलनकर्त्यांना उत्तर देताना सांगितले की जगदाळे मामा हॉस्पिटल आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना सोसायटी यांच्यात करार झाला असून येथून पुढे तात्काळ कोरणा रुग्णांना मोफत उपचार केले जातील.
आज शिवसेनेने केलेल्या या आंदोलन वेळी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी स्पष्ट केले की कर्मवीर जगदाळे मामा यांच्या पावन स्पर्शाने आणि त्यांच्या त्याग बलिदान आणि कष्टातून ही संस्था उभारली आहे. आणि या संस्थेच्या हॉस्पिटलला असं नियमबाह्य वागणं योग्य दिसत नाही. तसेच या कोरोणा संकटाच्या काळामध्ये माणुसकीचे दर्शन संस्था किंवा हॉस्पिटल देत नाही हे कर्मवीर जगदाळे मामा यांच्या बलिदानाला शोभणार नाही. बार्शी तालुक्यामध्ये कोरोणा रुग्णांची संख्या वाढत असताना त्यांच्याकडून काही लाखाच्या रकमेत बिले दिली जातात आणि दिले देण्यास विलंब झाला किंवा ज्यांची परिस्थिती नाही अशांचे रुग्ण सोडले जात नाहीत. ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांची मृतदेह कोरोना पॉझिटिव्ह असतानासुद्धा 20 ते 21 तास ताटकळत ठेवले जातात. शासनाने कोरोणा मोफत उपचारासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना हॉस्पिटल ला मंजूर केली असून त्याचा फायदा रुग्णांना का मिळत नाही. असा खडा सवाल यावेळी आंधळकर यांनी विचारला.
यावेळी आंदोलन कर्त्या ना उत्तर देताना डॉक्टर यादव यांनी सांगितले की महात्मा फुले जन आरोग्य योजना ही लागू झालेली आहे दवाखान्यात आणि त्यांच्यात करार केला आहे मात्र काही तांत्रिक अडचणी होत्या त्या आता दुरुस्त झालेले आहे तात्काळ आम्ही या योजनेअंतर्गत कोरोणा रुग्णांना उत्तम उपचार देण्याची भूमिका ठेवली आहे आणि जगदाळे मामा हॉस्पिटल हे उत्तम रित्या कोरोणा रुग्णांना सेवा देण्यासाठी तत्पर आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त आहे असेही सांगितले. यावेळी बार्शी शहर शिवसेना अध्यक्ष दिपक आंधळकर , शिवसेनेचे कार्याध्यक्ष राजेंद्र गायकवाड शिवसेना रिक्षा सेनेचे अध्यक्ष राजेंद्र मुळे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.