प्रतिनिधी/ मडगाव
दैवज्ञ ब्राह्मण मठाधिश्वर प. पू. श्री श्री सच्चिदानंद ज्ञानेश्वर भारती महास्वामीजी आज 31 जानेवारीपासून दोन दिवसांच्या गोवा दौऱयावर येत आहेत. गोव्यात त्यांचे वास्तव्य कासरपाल येथील श्री देवी महामाया कालिका संस्थानमध्ये असेल.
31 जानेवारी रोजी सायंकाळी 7 च्या दरम्यान मठाधिश्वरांचे देवस्थानात आगमन होणार असून देवस्थान समितीतर्फे त्यांचे यावेळी हार्दीक स्वागत करण्यात येईल. 1 फेब्ा्रgवारी रोजी सकाळी 8 वाजता तळावली -फोंडा येथील एका कार्यक्रमासाठी स्वामी प्रयाण करतील व दुपारी कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा कासरपालला येतील.