प्रतिनिधी /मडगाव
दैवज्ञ समाज, मडगावचे नव्यानेच निवड झोलेले अध्यक्ष डॉ. दिलीप वेर्णेकर यांचे सोमवारी सायंकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 69 वर्षाचे होते.
अंत्ययात्रा आज मंगळवारी दुपारी 12 वाजता त्यांच्या किरभाट -नुवे येथून मडगाव स्मशानभुमीकडे निघेल.
सोमवारी सायंकाळी नवयानेच निवड झालेल्या दैवज्ञ समाज, मडगावच्या कार्यकारिणीची एक बैठक सोमवारी सायंकाळी देवज्ञ भवनात झाली व त्यात डॉ. †िंदलीप वेर्णेकर यांची अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली. त्यानंतर आपल्या सदस्येंना उदेशून भाशाण करीत असताना अकस्मात ते कोसळले. थ्याना लगेच जवळचय एका खासगी इज्स्पितळात उपचारासाठी नेले. मात्र, उपज्चार चालू असताना त्याना मृत्यू आला.
त्यांच्यामागे पत्नी दिप्ती (प्रतिभा), एक विवाहीत मुलगा व एक विवाहीत मुलगी व एक नातू असा परिवार आहे.
नुवे लायस्न क्लबचे ते माजी अध्यक्ष होते तसेच कासरपाल येथील श्री देवी महामाया कालिका संस्थानाचे क्रियाशील महाजन होते.
आपले एक जवळचे स्नेही गेले अशी प्रतिक्रिया दैवज्ञ समाज, मडगावचे माजी अध्यक्ष तथा उद्योगपती मनोहर रायकर यांनी व्यक्त केली. गेली 12 वर्षे ते सातत्याने दैवज्ञ समाज आयोजीत करीत असलेल्या वैद्यकीय शिबिरात भाग घेत होते. एक चांगली व्यक्ती आमच्यातून हरपली अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
कासरपाल येथील श्री देवी महामाया कालिका संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र वेर्लेकर यांनी डॉ. वेर्णेकर यांच्या निधनावर दुख व्यक्त करताना डॉ. वेर्णेकर यांनी त्यांच्या दांडग्या अनुभवातून या संस्थानला अनेक वर्षे मार्गदर्शन केल्याचे सांगितले.
दैवज्ञ समाज, मडगावचे माजी अध्यक्ष तसेच जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य अतूल वेर्लेकर यांनी डॉ. दिलीप वेर्णेकर यांच्या आकस्मीक निधनामुळे दुःख व्यक्त केले आणि नुवे गावच्या लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले तसेच दैवज्ञ समाजातील एक आदराचे स्थान असलेले डॉ. वेर्णेकर आमच्यातून निघून गेल्यामुळे समाजाची मोठी हानी झाल्याचे सांगितले. अनेक गोरगरिबांचे ते कैवारी होते, श्री.वेर्लेकर म्हणाले.
ब्रम्ह्दैवज्ञ वाजेकर रायकर फॅमिली ट्रस्टचे माजी अध्यक्ष रमाकांत रायकर तसेच विद्यमान अध्यक्ष अशोक रायकर यांनीही डॉ. वेर्णेकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.
राय येथील केसरबाय मेमोरियल ट्रस्टचे सोमनाथ रायकर यांनी डॉ. †िंदलीप वेर्णेकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आणि एक उत्यंत आनंदी, उत्साही, संगीतप्रेमी आणि मनमिळावू स्वभावाची व्यक्ती आमच्यातून गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.