प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनमुळे सर्व क्षेत्रातील व्यावसायिक आणि कामगारांना फटका बसला आहे. येथील सुवर्ण कारागिरही संकटात सापडले आहेत. यामुळे शनिवारी दैवज्ञ सुवर्णकार व्यावसायिक संघ शहापूर यांच्यावतीने गरजू कारागिर तसेच नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, जि. पं. शिक्षण व आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष रमेश गोरल उपस्थित होते. दैवज्ञ सुवर्णकार व्यावसायिक संघाचे अध्यक्ष अमित हेरेकर, भाजप नेते किरण जाधव, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, राजेंद्र बिर्जे, बाळासाहेब जोशी, सचिन शिरोडकर, गुरुनाथ शिरोडकर, प्रकाश कलघटकर, प्रदीप अर्कसाली, सागर हळदणकर, सुरेश चिंचणेकर, बाळू बांदिवडेकर, बंडू सांबरेकर आदी उपस्थित होते. जुना पी. बी. रोड येथील जयशंकर भवनमध्ये शुक्रवारी हा कार्यक्रम झाला. यावेळी 70 जणांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.