प्रतिनिधी /मडगाव
बार्देस तालुक्यातील शिरसई -थिवी येथे झालेल्या एका चोरीसंदर्भात कोकण रेल्वे पोलिसानी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.
कर्नाटकातील मुद्देबिहाळ -बिजापूर येथील 35 वर्षीय सत्या उर्फ रमेश वडार (35) आणि उत्तर प्रदेशातील मिर्जापूर गावातील निरज सोनकर (19) या दोन संशयित आरोपींना चोरीच्या आरोपावरुन अटक केली.
अटकेनंतर या संशयितांची सखोल चौकशी केली तेव्हा शिरसई -थिवी येथे झालेल्या चोरीची या संशयितानी कबुली दिली आणि चोरीचा ऐवज पोलिसांच्या स्वाधीन केला.
भारतीय दंड संतिहेच्या 454, 457 तसेच 380 कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.