प्रतिनिधी / वास्को
वेर्णा पोलिसांनी गुरूवारी दोघा चोरटय़ांना गजाआड करून त्यांच्याकडून 1 लाख 40 हजार किमतीचे 6 मोबाईल फोन हस्तगत केले. पोलिसांनी हे चोरटे वापरत असलेली एक डियो दुचाकही जप्त केली आहे. चोरटय़ांची नावे मार्टीन्स(21) व पुष्कर सुनोर(26) अशी आहेत.
उपलब्ध माहितीनुसार हे दोघेही चोरटे वास्कोतील दाबोळी व चिखली भागातील राहणारे आहेत. या चोरटय़ांनी अनेकांचे मोबाईल फोन लंपास केले होते. हे दोघेही वेर्णा पोलिसांच्या हाती लागताच. त्यांचे बिंग फुटले. त्यांच्या पोलिसांनी 1 लाख 40 हजार रूपये किमतीचे 6 मोबाईल हस्तगत केले. तसेच एक डियो दुचाकीही जप्त केली. त्यांना दोन दिवसांच्या रिमांडवर पोलीस कोठडीत ठेवण्यात आलेले आहे.