कागल /प्रतिनिधी
दोघा मोटरसायकल चोरटयांना पकडण्यात कागल पोलिसांना यश आले आहे. सचिन राजेंद्र देसाई (वय २०, रा. सिद्धार्थनगर कोरोची ता . हातकणंगले) व अभिनंदन सुरगोंडा पाटील (वय २८ , रा. जैन मंदिर जवळ, कोरोची, ता . हातकणंगले) या दोघा मोटर सायकल चोरट्यांना कागल पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच मोटर सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
आरोपी अभिनंदन पाटील याने कागल, कुंभोज, तमदलगे, निमशिरगाव येथून एकूण चार व सचिन देसाई याने शहापूर येथून एक मोटर सायकल चोरल्याची कबुली दिली आहे. कागल, जयसिंगपूर व हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीतून या मोटरसायकली चोरीला गेल्या होत्या.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाघचौरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील, पोलीस अमलदार अनंत कोंडरे यांनी तपास केला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक निखील कर्चे, राजाराम पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.