दोडामार्ग – वार्ताहर-
वायंगणतड येथील एक खाजगी विहीर काल रात्री कोसळली त्यामुळे या विहिरीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाचे हाल झाले आहेत. राजाराम महादेव वंजारी यांची ही विहीर असून या विहिरीचा त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच घरालगतच्या शेती बागायतीसाठी उपयोग होत असे. नुकतेच आलेल्या तौक्ते वादळात या विहिरीचा काही भाग कोसळला होता. तर काल शुक्रवारी रात्री या विहिरीचा आणखीन बराचसा भाग पुन्हा कोसळला त्यामुळे वंजारी कुटुंबीय चिंतेत सापडले आहे. दरम्यान कोसळलेल्या या विहिरीचा संबधित गावाच्या तलाठ्या करवी सोमवारी रीतसर पंचनामा करण्यात येणार असल्याचे मंडळ अधिकारी प्रेमानंद सावंत यांनी राजाराम वंजारी यांना सांगितले.