राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती दोडामार्ग यांचा पुढाकार
साटेली भेडशी /प्रतिनिधी-
सोमवार दि.०२ जुलै रोजी सायं.६ वा.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती यांच्या पुढाकाराने दोडामार्ग येथे शीत “शवपेटीका” (dead body preservator , freezer ) लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला.
लोकार्पण सोहळ्यानंतर ही शित शवपेटीका दोडामार्ग तालुक्यातील गरजूंना उपलब्ध असेल. तसेच या सेवेचा माफक शुल्क देवुन लाभ घ्यावा.असे आवाहन समितीमार्फत करण्यात आले आहे.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती दोडामार्ग सर्व स्वयंसेवक आणि कशाळीकर कुटूंबीय उपस्थित होते .
अधिक माहिती व संपर्कासाठी डाॅ.राजाराम सतीश घोटगे
(७०६६३९९७२१) , निलेश मोरजकर (९४२२८४७४२९) यांच्याशी संपर्क करावा व गरजूंना या सेवेबद्दल माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.