वार्ताहर / दोडामार्ग:
दोडामार्ग तहसीलदारपदाचा कार्यभार गुरुवारी अरुण खानोलकर यांनी स्वीकारला. यावेळी नायब तहसीलदार एन. एन. देसाई, अधिकारी व कर्मचाऱयांनी त्यांचे स्वागत केले.
खानोलकर हे मुंबई शहर, कुलाबा येथे अतिक्रमण निष्कासित, बांधकाम काढून टाकणे या विभागात तहसीलदार म्हणून कार्यरत होते. यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात मायनिंग इन्स्पेक्टर व सावंतवाडी प्रांत कार्यालयात शिरस्तेदार म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे. शुक्रवारी विविध सामाजिक संस्था, राजकीय पदाधिकाऱयांनी खानोलकर यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. यावेळी खानोलकर यांनी जनतेची कामे रेंगाळत न ठेवता ती नियमानुसार व तत्परतेने केली जातील, अशी ग्वाही दिली.