दोडामार्ग – वार्ताहर-
दिवाणी न्यायालय दोडामार्ग यांच्या वतीने 1 ऑगस्ट रोजी दिवाणी न्यायालय दोडामार्ग येथे सकाळी 10.30 वाजता राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. उच्च न्यायालयात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग ओरस यांनी दिलेल्या निर्देशांचे अनुसरून लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील लोकअदालत पक्षकारांच्या हितासाठी आयोजित करण्यात आलेले आहे त्यातुन त्यांना कमी वेळात प्रभावी न्याय मिळू शकतो.
ज्या पक्षकारांची प्रलंबित असलेली फौजदारी व दिवाणी प्रकरणे, कौटुंबिक वाद, पोटगी इत्यादी प्रकरणे तसेच वीज वितरण कंपनी, दूरसंचार निगम, वित्तीय संस्था, बँका, ग्रामपंचायत,इत्यादी जास्तीत जास्त प्रकरणे दाखल करून वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात यावे यासाठी पक्षकारांनी उपस्थित राहून खटले मिटवावेत तसेच कोणत्याही पक्षकार व वकील यांस न्यायालयात प्रलंबित प्रकरणांमध्ये लोकअदालतपूर्वी आपले प्रकरणाची पूर्व बोलणी करणे करणे आवश्यक वाटत असल्यास त्यांचे करीता दिनांक 19 जुलै 2021 पासून कार्यालयीन दिवशी दररोज दुपारी 02 ते 02.30 वाजता वेळे देण्यात येणार आहे त्याकरिता संबंधितांनी दिवाणी न्यायालय दोडामार्ग येथे संपर्क साधावा असे आवाहन दोडामार्ग दिवाणी न्यायाधीश डि. बी. सुतार यांनी केले आहे.