दोडामार्ग /वार्ताहर-
दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या सुशोभीकरण व नूतनिकरणाचे काम येत्या 15 ऑगस्ट पर्यन्त पूर्ण करणार असल्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने दोडामार्ग भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आज दिले. ग्रामीण रुग्णालयातील या कामांवरून पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात आज ठिय्या मांडले होते. त्यावेळी हे आश्वासन देण्यात आले. दरम्यान सांगितलेल्या कालावधीत कामे पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला.