पेट्रोल-डिझेल 40 पैशांनी महाग ः सीएनजी दरात रुपयाने वाढ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रतिबॅरल 100 डॉलरच्या खाली आल्यानंतरही भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याचे सत्र सुरूच आहे. तसेच सीएनजीच्या दरातही 1 रुपयांनी वाढ झाली आहे. सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी प्रतिलिटर 40-40 पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोलचा दर 103.81 रुपये झाला असून डिझेलचा दर 95.07 रुपये प्रतिलिटर झाला आहे. देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱया मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 118.83 रुपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेलने 103.07 रुपये ही उच्चांकी पातळी गाठली आहे.