साताऱयातील घरफोडी सत्र थांबेना
प्रतिनिधी/ सातारा
साताऱयात चोरी, घरफोडय़ांचे सुरु असलेले सत्र थांबत नसल्याने या चोरटय़ांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. चोरटय़ांनी एका फायनान्स कंपनीचे कार्यालय फोडून 62 हजार 356 रुपयांची रोकड लंपास केली असून दुसऱया घटनेत मंदिरातील 50 हजार रुपयांच्या मुर्ती चोरुन नेण्याची घटनाही घडली असून याबाबत सातारा व शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 रोजी रात्रीच्या वेळी साताऱयातील बाँबे रेस्टारंट परिसरातील म्हावशे पेट्रोल पंपाजवळ असलेल्या उत्तेकर आर्केडमधील एल. एन. टी. फायनान्स कंपनीच्या कार्यालयाचा दरवाजा उचकटून अज्ञात चोरटयांनी कार्यालयाच्या लॉकरमधील 62 हजार 356 रुपयांची रोकड लंपास केली आहे. याबाबत कंपनीचे कर्मचारी अतिक मैनुद्दीन मणेर (वय 28 रा. स्टेट बँकेजवळ, कोरेगाव) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या चोरीचा अधिक तपास पोलीस नाईक भोसले करत आहेत.
तर दुसऱया घटनेत साताऱयातील व्यंकटपुरा पेठेतील जुन्या घरात असलेल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील गाभाऱयातील 50 हजार रुपये किंमतीच्या गोपाळ कृष्णाच्या दोन मूर्ती, अंबाबाई देवीच्या दोन पितळी मूर्ती, माता जोगेश्वरी देवीची मूर्ती, पितळी घंटा, पंचपाळी असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना दि. 1 ऑक्टोबर रोजी घडली आहे. याबाबत सविता दीपक दीक्षित (रा. प्रथमेश पार्क, मंगळवार पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी एकाबाबत संशय व्यक्त केला असून या चोरीचा अधिक तपास पोलीस हवालदार भोसले करत असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली.
घरफोडी, दुचाकी चोऱयांचे सत्र थांबेना
सातारा शहर व परिसरात दररोज दुचाकी चोऱयाच्या घटनाही घडत आहेत. यातील दुचाकी चोऱयांचे तपास लागत असले तरी दुचाकी चोऱयांच्या घटना काही थांबत नाहीत. तर बंद घरे टार्गेट करुन ऐवजांवर डल्ला मारणारे चोरटे अद्यापही पोलिसांना सापडत नाहीत. रात्री तर घटना घडतातच पण भर दिवसाही घरफोडय़ा वाढल्याने चोरटय़ांनी नागरिकांसह पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण केलेले आहे.