अवंतीपोरा येथे सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये संघर्ष
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा येथील त्राल भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये बुधवारी चकमक झाली. यादरम्यान सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या संघर्षानंतर दिवसभर शोधमोहीम सुरू होती. पोलीस आणि सुरक्षा दलाचे संयुक्त पथक या कारवाईत गुंतल्याचे जम्मूचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असून उमर तेली उर्फ तल्हा आणि सफात मुझफ्फर सोफी उर्फ मुआविया अशी त्यांची नावे असल्याचे सांगण्यात आले. सदर दहशतवादी लष्कर-ए-तोयबा आणि अन्सर गझवातूल हिंद या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. यावर्षाच्या प्रारंभी झालेल्या सरपंचाच्या हत्या प्रकरणात त्यांचा समावेश होता. तसेच त्यापूर्वी विविध गुन्हय़ांमध्येही त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.