मुंबई / वृत्तसंस्था
शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मोठय़ा प्रमाणात घसरलेला शेअरबाजार मंगळवारी उसळला आहे. मंगळवारी दिवसअखेर मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 917 अंकांनी वधारून 40,789.38 अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टीही 271.75 अंकांच्या वधारासह 11,979.65 अंकांवर स्थिरावला. जागतिक शेअरबाजारांची स्थिती सुधारल्याचा परिणाम भारतातील शेअरबाजारांवरही दिसून आला आहे.