बेळगाव : बेळगाव शहर व जिल्हय़ात दोन दिवसात कोरोनाचे 24 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 563 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 26 हजार 680 वर पोहोचली आहे.
शिवबसवनगर, हिंदवाडी, टीव्ही सेंटर, अनगोळ, कणबर्गी, शहापूर, विनायकनगर, आनंदवाडी-शहापूर आदी ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. बुधवारी रात्री उपलब्ध झालेल्या माहितीवरून सध्या 138 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार 26 हजार 198 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 32 हजार 197 जण अद्याप 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. 1 हजार 97 जणांचा अहवाल यायचा आहे. आतापर्यंत 4 लाख 64 हजार 939 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 4 लाख 34 हजार 590 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.